नंदुरबार l प्रतिनिधी
आदीवासी समाजाच्या विविध मागणी संदर्भात नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज 11 दिवस पूर्ण झाले असून शासनाला जागे करण्यासाठी आज तूर वाद्य वाजवून शासनाचा निषेध करण्यात आला.
आदिवासी समाजाच्या मयती मध्ये हे तूर वाद्य वाजवण्यात येते. म्हणून झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हे तूर वाद्य वाजवण्यात आले .
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आहे. आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आदिवासी मंत्र्यांना वेळ मिळत नाही आहे.
म्हणून आंदोलकांतर्फे आदिवासी विकास मंत्री डॉ विजय कुमार गावित यांचा निषेध करण्यात आला.नंदुरबार जिल्हा सह महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा विकास का झाला नाही कारण आदिवासी विकास मंत्री हे भ्रष्ट्र आहेत म्हणून आदिवासी चा विकास हा खोळंबला आहे. पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्या शासन स्तरावर मांडल्या जातील असे आश्वासन दिले .
परंतु जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी मंत्र्यांना आदिवासींना भेटायला वेळ मिळत हे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे .म्हणून आदिवासी मंत्री विजय कुमार गावित यांच्या निषेध करण्यात येतो असे आंदोलकांना तर्फे सांगण्यात आले. यावेळी के.टी.गावित हिरामण पाडवी अजय वळवी रोहन नटावदकर ,राणी गावित, यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.