Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोठली खु.येथे कृषि संजीवनी पंधरवडानिमित्त महिला शेतकऱ्यांचा सन्मान

team by team
June 29, 2024
in राज्य
0
कोठली खु.येथे कृषि संजीवनी पंधरवडानिमित्त महिला शेतकऱ्यांचा सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, , तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी कार्यालय धानोरा यांच्यातर्फे नंदुरबार तालुक्यातील कोठली खु.येथे कृषि संजिवनी पंधरवाडानिमित्त कृषि महिला शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात आला.

नी कृषि विभागामार्फत कृषि संजिवनी पंधरवाडा साजरा करण्यात येत असुन या कालावधीत गावागावात शेतकऱ्यांना सभा, मेळावे, गांव बैठका, शिवार फेरी या माध्यमातुन मार्गदर्शन करण्यात येत आहे. या पंधरवडयातीलच दि.27 जून रोजी नियोजित कृषि महिला शेतकरी सन्मान दिवस कोठली खु. या ठिकाणी साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रगतशिल, प्रयोगशिल महिला शेतकरी, कृषि क्षेत्रात, कृषि पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपली प्रगती साधत आपले कार्य इतरांना आदर्श ठरावे अश्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सन्मानार्थी महिला शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतात सन्मानाबद्ल आभार व्यक्त करत आपल्या कार्याची माहिती इतरांना दिली. यावेळी कृषि पर्यवेक्षक धानोरा हेमंतकुमार लाड यांनी सन्मानार्थींचे अभिनंदन करत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना महिलांनी आता कोणत्याच क्षेत्रात मागे न राहता सर्वच ठिकाणी आपली प्रगती करावी, कृषि विभागात महिलांसाठी असलेल्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेत आपली प्रगती साधावी, महिला शेतकऱ्यांकरीता शासनाचे पुरस्कार, शेतीकामातील कष्ट कमी करण्यासाठी उपलब्ध सुधारीत यंत्र- सामुग्रीचा अवलंब करावा या करीता कृषि विभातील कृषि यांत्रिकीकरण योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, आदी विषयांवर माहिती दिली.

याप्रसंगी कृषि पर्यावेक्षक धानोरा आर.टी.पाटील यांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास कोठली खु, निमगांव, वागशेपा, गुजर जांभोली, लोय व परिसरातील महिला शेतकरी, महिला गटाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम आयोजनात तालुका कृषि अधिकारी विश्वजीत पाडवी व मंडळ कृषि अधिकारी धानोरा पुरूषोत्तम धनगर यांचे मार्गदर्शन लाभले. सुत्रसंचालन कृषि सहाय्यक काशिनाथ चौधरी यांनी तर आभार कृषि सहाय्यक मनोज कोकणी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि सहाय्यक स्नेहलकुमार पाडवी, संग्राम पाडवी, शशिकला कोकणी व अश्विनी वळवी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना संपर्कप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

Next Post

ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांचे आंदोलन

Next Post
ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांचे आंदोलन

ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add