Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विश्वयोग दिनानिमित्त नंदनगरीत भव्य योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

team by team
June 22, 2024
in आरोग्य
0
विश्वयोग दिनानिमित्त  नंदनगरीत भव्य योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;

नंदुरबार l प्रतिनिधी
जागतिक स्तरावर जाहीर झालेल्या 21 जूनच्या विश्व योग दिनानिमित्त नंदुरबार येथील विश्वयोग दिन संयोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शुक्रवार दि. 21 जून रोजी सकाळी 7 ते 8:30 दरम्यान  योग दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय योग शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
          नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित ग.तू. पाटील महाविद्यालय, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व योग दिनानिमित्त एक दिवसीय योग प्रशिक्षण शिबिर शुक्रवारी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र संघाने  21 जून हा दिवस आंतर राष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार 2015 पासून  विश्वयोग दिवस नंदनगरीत व्यापक स्वरूपात  यंदा दहावा विश्वयोग दिन साजरा करण्यात आला.  सर्वप्रथम सकाळी जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते सरस्वती माता प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी दिप प्रज्वलनासाठी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील,  जे.ए. चौरे, राज्य परिवहन महामंडळाचे नंदुरबार आगार प्रमुख संदीप निकम, उपप्राचार्य एस. यु. पाटील, डॉ. संदीप पाटील, आर्ट ऑफ लिविंगचे हिरालाल महाजन, अनिल अग्रवाल, व्यासपीठावर उपस्थित होते.
           यावेळी हिरालाल महाजन, अनिल अग्रवाल, एस. एन.पाटील, नवनीत शिंदे, अजयसिंग गिरासे, किरणताई राजपूत, प्रतीक्षा प्रेम वायकर या  प्रशिक्षित योग शिक्षकांद्वारे योगासने  प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायाम याचे प्रशिक्षण देण्यात आले.विश्व योगदिन  संयोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, आर्ट ऑफ लिविंग,  जी. टी.पाटील महाविद्यालय, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ, गायत्री परिवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नंदुरबार या सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.पतंजलि योग समितिचे जिल्हा प्रभारी एन. डी. माळी,भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे, युवा भारत जिल्हा प्रभारी आशिष पावरा, जिल्हा मिडिया प्रभारी महादू हिरणवाळे,तालूका प्रभारी अजयसिग गिरासे,
योग शिक्षक एस.एन. पाटील, किरणताई राजपूत, प्रतिक्षा प्रेम वायकर, वाघ सर, राजवीर सिंह, अंकूश वसावे, यांनी  सहकार्य केले. विश्व योग दिन समारंभास शहरातील श्रॉफ  हायस्कूल, डी. आर. हायस्कूल, अँग्लो  उर्दू हायस्कूल, सोनिया गांधी विद्यालय, कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, तसेच शिक्षक, प्राध्यापक, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, पुरुष आणि योग प्रेमीं मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारच्या चिमुकल्या नारायणीने बुद्धिबळात पटकावले आशियाई अजिंक्यपद.. ८ वर्षांखालील मुलींच्या गटात जिंकले २ सुवर्णपदक

Next Post

पालकांना एकाच दुकानावरून गणवेश खरेदी करण्याच्या सूचना, कारवाईची उबाठातर्फे मागणी

Next Post
पालकांना एकाच दुकानावरून गणवेश खरेदी करण्याच्या सूचना, कारवाईची उबाठातर्फे मागणी

पालकांना एकाच दुकानावरून गणवेश खरेदी करण्याच्या सूचना, कारवाईची उबाठातर्फे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add