नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील विविध नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश घेण्यासाठी एकाच दुकानातून गणवेश खरेदी करण्याचे सूचना देण्यात आले आहेत .त्यामुळे पालकांची लूट होत आहे अन्य दुकानांवर कमी दरात गणवेश उपलब्ध असताना देखील जास्त दराने गणवेश खरेदी करून पालकांना भुरदंड सोसावा लागत आहे. या संदर्भात शिवसेना उबाठा पक्षामार्फत जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कारवाई न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री लहुकर यांना जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, उपमहानगर प्रमुख भक्तवत्सल सोनार, उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राज पाटील, उपतालुकाप्रमुख कांतीलाल जाधव, शहर सोशल मीडिया प्रमुख राजपूत यांच्यासह शिवसैनिकांनी निवेदन दिले यावेळी निवेदनावर वरील पदाधिकाऱ्यांच्या सह्या होत्या.
शिवसेने मार्फत शिक्षण अधिकारी यांना देण्यात आलेला निवेदनाच्या अशा नंदुरबार शहरातील सर्व नामांकित शाळा नंदुरबार शहरातील दिपक रेडिमेड स्टोअर्स, घी बाजार या एकाच दुकानातुन खरेदी करण्यास सक्ती करण्यात येते. शाळेत गणवेश संदर्भात विचारणा केली असता शाळेतुन दिपक रेडीमेट स्टोअर्स या दुकानाचे कार्ड दिले जाते व संबंधीत दुकानात पालक कपडे खरेदी करण्यासाठी गेले असता पालकांना अरेरावीची व अतिशय हिन दर्जाची वागणुक दिली जाते. तसेच दुकानात कोणत्याही प्रकारे सवलत न देता मर्जीप्रमाणे कपड्याचे दर लावुन विकले जातात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही.
शाळा प्रशासन कोणत्याही एकाच दुकानावर खरेदी करण्याची सक्ती करत असते त्यामुळे शाळा प्रशासनाला काहीतरी मलीदा निश्चितच संबंधीत दुकानदाराकडुन मिळत असेल यात काही शंका नाही.
तरी आपणास आमच्या पक्षातर्फे विनंती करण्यात येते की, आपल्या स्तरावरुन संबंधीत दुकानदार व शालेय प्रशासनावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. आपल्या स्तरावरुन योग्य कार्यवाही न झाल्यास आम्ही शिवसेना नंदुरबार (उबाठा गट) तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व संबंधीत दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.