नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापतीपदी संध्या वकील पाटील तर उपसभापतीपदी गोपीचंद गलचंद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. निवडीनंतर उभयतांच्या सत्कार करण्यात आला.
सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशीयांनी सभापती व उपसभापती पदासाठी वर्षभराच्या फॉर्मुला ठरवलेला आहे.मागील महिन्यात मावळते सभापती विक्रमसिंह वळवी व उपसभापती वर्षा पाटील यांनी पदाच्या राजीनामा दिल्याने मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता सभापती पदासाठी संध्या पाटील तर उपसभापती पदासाठी गोपीचंद पवार यांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.
विहित मुदतीत वरील दोन्ही उमेदवारांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले. बाजार समितीच्या सभागृहात सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. चौधरी यांना सहाय्य सचिव योगेश अमृतकर यांनी केले. दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी केली असता ते वैध ठरवण्यात आले असता सभापतीपदी संध्या पाटील व उपसभापतीपदी गोपीचंद पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत नवनियुक्त सभापती उपसभापतींच्या सत्कार केला. याप्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, माजी जि.प अध्यक्ष वकील पाटील, रमेश गावित, बाजार समिती संचालक विक्रमसिंह वळवी,वर्षा पाटील, कुशलचंद बिर्ला,सुनील पाटील, दीपक मराठे, ठाणसिंग राजपूत, किशोर पाटील, अनिल गिरासे, मधुकर पाटील,लकडू चौरे, विजय पाटील,दिनेश पाटील,संजय पाटील, गिरीश जैन,प्रकाश माळी, अशोक आरडे आदी उपस्थित होते.








