नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इ. 10 वी च्या परिक्षेचा निकाल100 टक्के लागला असून यामध्ये एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवित यश प्राप्त केले.
परीक्षेसाठी एकूण 257 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यामध्ये विशेष प्राविण्यासह 114 विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीमध्ये 110 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे या विद्यार्थ्यांमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे 5 विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक डॉ.राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन रेव्ह.जे.एच.पठारे,शाळेच्या प्राचार्य सौ.नुतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार,पर्यवेक्षक वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी,ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग इत्यादींनी कौतुक केले.
परीक्षेत यश प्राप्त केलेले विद्यार्थी
प्रथम क्रमांक पाडवी जागृती पंकज (92.20 टक्के), द्वितीय क्रमांक, पवार अंजली संतोष (92 टक्के ), तृतीय क्रमांक, पावरा स्वाती दिलीप (91.60 टक्के ), तृतीय क्रमांक पावरा तन्वी कांतीलाल (91.60 टक्के ), चतुर्थ क्रमांक वळवी वर्षा अमरसिंग(90 टक्के ),पाचवा क्रमांक वसावे लक्ष्मी करण सिंग (89.40. टक्के )
सदर परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.