नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी विविध नेत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील नटावद या गावी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.भाजपाच्या उमेदवार डॉ.हिना गावीत यांनी नंदूरबार येथील डी.आर. हायस्कूल येथील मतदान केंद्रात मतदान केले.
नंदुरबार लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी तसेच काँग्रसचे माजी मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी धडगाव तालुक्यातील असली येथील मतदान केंद्रात मतदान केले.
शहादा तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सोमावल बु.येथे सहपत्नी मतदान केले.
नवीन सोनगीर पाडा ता. नंदुरबार येथे माजी.आ.चंद्रकांत रघुवंशी व ॲड.राम रघुवंशी यांनी मतदानाचा हक्क बजावला.नवापूर तालुक्यातील नवागाव येथे नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
राज्यातील पहिले मतदान केंद्र अक्कलकुवा तालुक्यातील मनीबेली आहे.राज्यातील पहिला मतदार रविता तडवी यांनी मतदान केले.