Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपा उमेदवार डॉ.हिना गावित यांचा मोबाईल हॅक; पायाखालची वाळू घसरल्याने काँग्रेसचा रडीचा डाव : डॉ. हिना गावित

team by team
May 13, 2024
in Uncategorized
0
नंदुरबार लोकसभेसाठी विविध नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी तथा महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांचा मोबाईल हॅक करण्यात आला असून त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकाचा वापर करून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

 

 

एकीकडे मतदान चालू असताना दुसरीकडे थेट उमेदवाराच्या क्रमांकावरून मतदारांची दिशाभूल करणारा असला प्रकार घडवणाऱ्यांची ताबडतोब चौकशी केली जावी आणि कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ.हिना विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेल कडे दिलेल्या अर्जात केली आहे.

 

डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या वतीने ही तक्रार देण्यात आली असून सायबर सेल पोलीस आता गुन्हेगारांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान याविषयीची अधिक माहिती देताना उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांनी हा प्रकार घडवला असल्याचा आरोप केला. शिरपूरचे ज्येष्ठ नेते अमरीश भाई पटेल यांच्या मोबाईलला हॅक करून असा प्रकार घडवला गेला होता व त्यांनाही तसले फोन त्यांच्या क्रमांकावरून जात असल्याचे निदर्शनास आले होते.

 

त्या पाठोपाठ महायुतीचे उमेदवार स्वतः डॉक्टर हिना गावित यांनाही काँग्रेसकडून भाजपा कार्यकर्त्यांना व मतदारांना तसले फोन जात असल्याचे निदर्शनास आले म्हणून त्यांनी दुपारी याची तातडीने दखल घेतली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, मतदान सुरू झाल्यापासून आम्हाला मिळालेला प्रतिसाद आणि आमचा होणारा विजय लक्षात आल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांनी रताळी चा डाव खेळायला सुरू केले. माझ्या मोबाईल नंबर ला हॅक करून माझ्या मोबाईल नंबर वरून लोकांना फोन करून त्यांच्या पक्षाला मतदान करण्याविषयी आवाहन करून लोकांची दिशाभूल करायचं काम पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष करत आहे. यावर मी कायदेशीर कारवाई केलेली आहे. या विषयांमध्ये मी एफ आय आर सुद्धा केलेला आहे, असे नमूद करून डॉक्टर हिना गावित पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हे आता अगदी शेवटच्या स्तरावर जाऊन जो रतडीचा डाव खेळत आहे याला नक्कीच जनता कडक उत्तर देईल, असा माझा विश्वास आहे. तरी आपल्याला जर अशा माझ्या मोबाईल नंबर वरून माझ्या पर्सनल नंबर वरून जर असे फोन आले तर आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. माझ्या मोबाईल नंबर वरून लोकांना चुकीचे कॉल जे जाऊन राहिले आहे हे पूर्णपणे खोटे आहे, असेही डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार लोकसभेसाठी विविध नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Next Post

नंदुरबार लोकसभेसाठी 67.12 टक्के मतदान

Next Post
नंदुरबार लोकसभेसाठी 67.12 टक्के मतदान

नंदुरबार लोकसभेसाठी 67.12 टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add