नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्या जवळील श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणित) सेवा केंद्रात दिनांक 30 एप्रिल ते 06 मे 2024 दरम्यान श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अखंड नामजप यज्ञ सप्ताह काळात २४ तास प्रहर सेवा होणार असुन अखंड प्रहर सेवेत अखंड विना वादन, अखंड श्री स्वामी समर्थ मंत्र जप व अखंड श्री स्वामीचरित्र सारामृत वाचन सेवा २४ तास अखंड 8 दिवस होणार आहे.
या सप्ताहात प्राधानिक स्वरूपात श्री गुरुचरित्र पारायण वाचन,श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री स्वामी समर्थ मंत्र जप, श्री नवनाथ पारायण, या सेवा केल्या जात असतात.
या सप्ताह काळात सेवा मार्गाच्या ग्रामअभियानाच्या 18 विभागा अंतर्गत श्रीजनकल्याण विभाग, विवाह संस्कार विभाग, पर्यावरण प्रकृती विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, शिशु संस्कार विभाग, बाल संस्कार विभाग, भारतीय संस्कृती व मराठी अस्मिता, सण वार व्रत वैकल्ये असे विविध विभागांचे स्टॉल लावून ग्राम अभियानाबद्दल संपुर्ण मार्गदर्शन केंद्रात दिले जात असते.
सप्ताह काळात विविध देव-देवतांच्या हवनात्मक सेवा केंद्रात केल्या जात असतात. रोज सकाळी नित्य स्वाहाकार नंतर औदुंबर प्रदक्षिणा त्यानंतर भूपाळी आरती नंतर सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण वाचन त्यानंतर दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री मल्हारी सप्तशती पाठ, श्री रुद्र वाचन , सायंकाळी श्री विष्णू सहस्त्रनाम , नित्य ध्यान, गीतेचा पंधरावा अध्याय, श्री स्वामी समर्थ जप ,यज्ञयाग अश्या विविध सेवा होणार असून.
6 मे 2024 सोमवार रोजी श्री सत्यदत्त पूजन, महाआरती व महाप्रसादाने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता होणार आहे.तरी जास्तीत जास्त भाविक सेवेकरी यांनी या सप्ताहात सहभागी होऊन सेवेचा लाभ व अनुभव घ्यावा. असे आवाहन नंदुरबार जिल्हा केंद्रा तर्फे करण्यात येत आहे.