Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फेस येथील 109 व 110 मतदान केंद्र जागेत बदल : मनीषा खत्री

team by team
April 28, 2024
in राज्य
0
फेस येथील 109 व 110 मतदान केंद्र जागेत बदल : मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 03- नंदुरबार या विधानसभा मतदार संघातील मौजे फेस ता. शहादा येथील मतदान केंद्र क्रमांक 109 व 110 यांच्या जागेत बदल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 03-नंदुरबार या विधानसभा मतदार संघातील मौजे फेस ता. शहादा येथील मतदान केंद्र क्रमांक 109 व 110 जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पुर्व-पश्चिम इमारत पश्चिमेकडील अनुक्रमे खोली क्र.1 व खोली क्र.2, या शाळेच्या इमारतीमध्ये निश्चित करण्यात आले होते.

तथापि, 12 एप्रिल, 2024 रोजी सायंकाळी अचानक झालेल्या बेमोसमी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मौजे फेस ता. शहादा येथील मतदान केंद्र क्रमांक 109 व 110 जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पुर्व-पश्चिम इमारत पश्चिमेकडील अनुक्रमे खोली क्र.1 व खोली क्र.2, या शाळेच्या इमारतीवरील छताचे पत्रे उडून गेल्याने इमारतीच्या व मतदान केंद्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच सदर इमारतीची वादळी वाऱ्यामुळे दुरावस्था होऊन अत्यंत धोकादायक झालेली असून दुरुस्ती करणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे हे मतदान केंद्र त्या परिसरातीलच अंगणवाडी केंद्र क्रमांक 1 मध्ये मतदान केंद्र क्रमांक 109 आणि अंगणवाडी केंद्र क्रमांक 2 मध्ये मतदान केंद्र क्रमांक 110 असा जागेमध्ये बदल करुन मिळण्याबाबतचा अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

त्यानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 03- नंदुरबार या विधानसभा मतदार संघातील मौजे फेस ता. शहादा येथील मतदान केंद्र क्रमांक 109 व 110 जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा पुर्व-पश्चिम इमारत पश्चिमेकडील अनुक्रमे खोली क्र. 1 व खोली क्र. 2 ऐवजी मतदान केंद्र क्रमांक 109 हे अंगणवाडी केंद्र क्रमांक 1 फेस येथे व मतदानर केंद्र क्रमांक 110 हे अंगणवाडी केंद्र क्रमांक 2, फेस येथे या जागेत बदल करण्यास परवानगी मिळाली असून तसा बदल करण्यात आला आहे.

या बदलाबाबत सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात ॲड.गोवाल पाडवी यांची प्रचारफेरी

Next Post

नवापूर शहरात महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनागावित यांची जोरदार प्रचार फेरी

Next Post
नवापूर शहरात महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनागावित यांची जोरदार प्रचार फेरी

नवापूर शहरात महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनागावित यांची जोरदार प्रचार फेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

चौपाळे ते नर्मदेपर्यंत दगाजी बापू पदयात्रा दिंडी; भक्ती, सेवा आणि अन्नदानाचा अखंड सोहळा

March 29, 2026
खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

खोडसगाव येथील भाजप कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश

March 29, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

March 29, 2026
नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add