नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात निवडणूकीची आदर्श आचारसंहिता निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार असल्यामुळे माहे मे व जून 2024 महिन्यात पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांना नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.