Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैध दारुची निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत 9 लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
April 18, 2024
in क्राईम
0
अवैध दारुची निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत 9 लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील अवैध दारुची निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत 9 लाख 8 हजार 616 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील अवैध धंदयांवर सततची कारवाई सुरू असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी त्यांचे स्टाफला दिलेल्या सुचनांनूसार 17 एप्रिल 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिनेश भदाणे, पोउपनि मुकेश पवार व स्टाफ असे नंदुरबार शहरातील करण चौफूली जवळ सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करुन संशयित वाहने तपासणी करीत असतांना करण चौफूली जवळ तळोदा-निझर शहराकडे जाणा-या रोडवर एक पांढ-या रंगाचे टाटा मांझा वाहनास हात देऊन थांबण्यास सांगितले असता सदरचे वाहन हे न थांबता ते तळोदा रोडकडे भरधाव वेगाने निघुन गेले.

 

 

त्यामुळे सदर वाहनावर संशय बळावल्याने वाहनाचा पाठलाग करुन त्यास थांबवून वाहनावरील चालक हा वाहन सोडून पळत असतांना त्यास शिताफीने पकडुन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव पंकज नामदेव चौधरी, वय 32 वर्षे, रा- साक्री नाका, नंदुरबार असे सांगितले व त्याचे ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 45 खाकी रंगाचे देशी दारुचे बॉक्स मिळून आले.

 

 

सदर वाहनचालकास अधिकची विचारपूस करता त्याने सांगितले की, त्याने सदरचा मुद्देमाल हा जोगणीपाडा गावातील एका शेतातून आणल्याचे सांगितले व त्याचा साथीदार प्रशांत विक्रम पाडवी असे संगणमताने बनावट दारु बनवून तिची चोरटी विक्री करीत असतात बाबत कळविले.

 

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकाने तात्काळ सदर जोगणीपाडा बोदडा रस्त्यावरील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन चेक केले असता पंकज चौधरी याचा साथीदार प्रशांत विक्रम पाडवी रा. जयहिंद कॉलनी, नंदुरबार हा मिळून आला. सदर ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये व शेतात बनावट दारुच्या बाटल्या व बनावट दारु बनविण्यासाठी लागणारी साहित्य असे एकूण 1 लाख 57 हजार 416 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

 

 

तरी सदरचा अवैध बनावट दारुचा साठा कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केला असुन दोनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोनही आरोपीकडुन एकुण 9 लाख 08 हजार 616 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात बनावट देशी दारु, बनावट दारु बनविण्यासाठीचे साहित्य, चोरटीविक्रीसाठी वापरण्यात आलेले वाहन, इ. असे जप्त करण्यात आले आहे. त्याअन्वये उपनगर

 

 

पोलीस ठाण्यात भादवि 328 वगैरे प्रमाणे तसेच महा. दारुबंदी कायदा कलम 65(ई), 108 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होऊन पुढील अधिक तपास सुरू आहे.

 

 

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सपोनि दिनेश भदाणे, पोउपनि मुकेश पवार, पोना मोहन ढमढेरे, पोना राकेश मोरे, पोना विकास कापूरे, पोना पुरुषोत्तम सोनार, पोशि विजय ढिवरे, पोशि शोएब शेख, पोशि अभय राजपूत यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रघुवंशी समाजाच्या वतीने शोभायात्रा, रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी

Next Post

कात्री ग्रामपंचायत अंतर्गत गाव-पाड्यांवर ३० विहिरींच्या कामाला सुरुवात

Next Post
कात्री ग्रामपंचायत अंतर्गत गाव-पाड्यांवर ३० विहिरींच्या कामाला सुरुवात

कात्री ग्रामपंचायत अंतर्गत गाव-पाड्यांवर ३० विहिरींच्या कामाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add