नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार 28 मार्च 2024 रोजी समस्त शिवभक्त साजरी करणार आहेत त्या अनुषंगाने 25 मार्च 2024 सोमवार रोजी सायंकाळी सात वाजता नंदुरबार शहरातील रायसिंगपुरा परिसरात मारुती व्यायाम शाळा जय हनुमान व्यायाम शाळा सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमान भागवताचार्य शिवचरित्रकार हरिभक्त परायण संजीव जी महाराज सोनवणे (चोपडेकर) यांच्या मधुर वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला नंदुरबार शहर व जिल्ह्यातील असंख्य शिवभक्त उपस्थित होते. या कीर्तनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
या जाहीर कीर्तनातून भगवताचार्य शिवचरित्रकार हरिभक्त परायण संजीव जी महाराज सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कीर्तन करून उपस्थित शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले. हजारोंच्या संख्येने शिवभक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते