नंदुरबार l प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील भाविकांवर आघात झाला आणि अपघातात दोन जण मृत्युमुखी पडून अनेक जण जखमी झाल्याचे कळताच खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईक चौकशी केली. एवढेच नव्हे तर जातीने उपस्थित राहून रुग्णसेवेला गती दिली.
सलाईन लावली किंवा नाही, अस्थिभंग किती आणि कसा आहे, एक्स-रे काढले किंवा नाही, अशी सर्व चौकशी करित अपघातग्रस्त महिला आणि मुलांची त्यांनी संवाद केला.
देवमोगरा (जि. नंदुरबार) येथे देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचे अॅक्सल तुटल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर सुमारे १७ भाविक जखमी झाले. हा अपघात अक्कलकुवा रस्त्यावर खापर ते उदापूर गावादरम्यान सायंकाळी घडला. मृत व जखमी बोराडी (ता. शिरपूर) येथील रामनगरचे रहिवासी आहेत. जखमींवर नंदुरबार व अक्कलकुवा येथे उपचार सुरू असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे.
ही घटना कळतच खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची तातडीने भेट घेतली. अस्थेवायीक चौकशी करून त्यांच्या उपचार सेवेला गती दिली. भारतीय जनता पार्टीचे शिरपूर तालुका अध्यक्ष राहुल रंधे, डॉक्टर विक्रांत मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.