शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांकडून शहादा तालुक्यातील म्हसावद गावात कृषी मेळावा संपन्न झाला.
कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून प्रात्यक्षिक कार्यांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते.
म्हसावद ता.शहादा येथे पपई व केळी पिकांचे एकात्मिक खत व्यवस्थापन या विषयावर शेतकरी बांधवांशी संवाद कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदीशभाई पाटील (उपाध्यक्ष,पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ शहादा) होते.तर प्रमुख अतिथी के.एस.वसावे (तालुका कृषी अधिकारी,शहादा) हे उपस्थित होते.यावेळी शेतकरी बांधवांना कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भरत सी.चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भटेसिंग गिरासे( ग्रामविकास अधिकारी म्हसावद),युवराज ठाकरे( सरपंच म्हसावद),युवराज वळवी (सरपंच पिंपरी), कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रकाश.एल.पटेल,रावे समन्वयक प्रा.चंद्रशेखर यु. पाटील,रावे प्रमुख प्रा.संदीप पाटील यांची उपस्थिती होती.शेतकरी बांधवांना परिसरातील सर्वाधिक उत्पन्न घेतले जाणारे पपई व केळी पिकांचे उत्पादनात वाढ व्हावी यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनाविषयी सखोल माहिती देण्यात आली.अध्यक्षीय समारोपात जगदीश पाटील यांनी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून प्रात्यक्षिक कार्यांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर भेट देऊन चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणा-या उपक्रमाचे स्वागत केले.
उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.उपक्रम यशस्वीतेसाठी कृषिदूतांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचे कौतुक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांनी केले.