शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे स. इ. पाटील कला, गि. बा. पटेल विज्ञान व श. ता. ख. वि. संघाचे वाणिज्य महाविद्यालय, शहादा, यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे उद्घाटन दि.28 रोजी अॅड. जगदीश कुवर यांच्या हस्ते संपन्न झाले.
मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी भूषविले.
यावेळी ऍड. जगदीश कुवर यांनी सायबर क्राईम, महिलांवरील अत्याचार व सावधानता याबद्दल विद्यार्थिनींना व्याख्यान दिले. सोशल मीडिया वापरतांना सावधानता गरजेची असते. अन्याय व छळ होत असेल तर लगेच योग्य व्यक्तीला सूचित करावे असे सांगितले. मुलींनी विचारलेल्या शंकांचे त्यानी निरसन केले.
कार्यशाळेसाठी नंदुरबार जिल्हा विद्यार्थी विकास समन्वयक डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या. युवती सभा समन्वयक प्रा.डाॅ. ए. एच. जोबनपुत्रा यांनी प्रस्तावना केली. उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळा आयोजनासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, व उपप्राचार्य डॉ. एस डी. सिंदखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.मीना पटेल व प्रा.वर्षा पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.एस. माळी यांनी केले.