नंदुरबार ! प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेच्यावतीने कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणार्या डॉक्टरांना सन्मानपत्र व वृक्षरोप वाटप करुन राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला.
कोरोना जागतिक महामारीत सर्वात महत्वाची जवाबदारी पार पाडणार्या डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रूग्णांना जीवनदान देण्यासाठी झटणार्या प्रत्येक डॉक्टरला दि.१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेच्यावतीने येथील मेडिकेअर हॉस्पिटलमधील डॉ.राजेश वसावे, डॉ.शिरीषकुमार शिंदे, पटेल सर्जिकलमधील डॉ.विजय पटेल, तुलसी हॉस्पिटलमधील डॉ.रोशन भंडारी, चरक नर्सिंग होम डॉ.विनय पटेल, स्पर्श हॉस्पिटलचे डॉ.प्रशांत ठाकरे तसेच त्यांच्या सर्व टीमचे सन्मानपत्र व वृक्ष देऊन गौरविण्यात आले. समाजामध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे आहे. मागील दीड वर्ष कोरोना संकटाशी लढताना डॉक्टरांच्या योगदानाचं त्याचप्रमाणं एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटानं बाजी लढवत असतो, तसं डॉक्टर आतापर्यंत धीरानं कोरोना विरुद्ध लढत आहेत. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता डॉक्टर्स दाखवत आहेत. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवीसिंग राजपूत (राणा), अमर राजपूत, आकाश चित्ते, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.