शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश सूतगिरणी संचालक मंडळ निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाही पॅनलच्या प्रचारासाठी लोणखेडा, डोंगरगाव, मंदाणे, ब्राह्मणपुरी परिसरातील गावांमध्ये सभासद मतदार बांधवांची भेट घेऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले.
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी लि.उंटावद-होळ ता.शहादा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक प्रचारासाठी लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त बुधवार दि.14 रोजी शहादा तालुक्यातील लोणखेडा,डोंगरगाव, सावखेडा ,वडछील,कर्जोत,पिंपर्डे, असलोद, मंदाणे, जावदा, दामळदा,भागापूर, गोगापूर, कवळीथ,ओझर्टा, रायखेड,खेडदिगर, ब्राम्हणपुरी परिसरातील मतदार-सभासद व ग्रामस्थांना भेटून लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी लोकशाही पॅनलचे प्रमुख तथा सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, ज्येष्ठ नेते माधवकाका पाटील, दूध संघाचे माजी चेअरमन उद्धवभाई पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा. मकरंद पाटील, उपसरपंच संजय पाटील,हरी लिमजी पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाई पाटील, विद्यमान संचालक मयूरभाई दीपक पाटील,माजी नगरसेवक के.डी.पाटील यांच्यासह लोकशाही पॅनलचे सर्व उमेदवार, समर्थकांसह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभासद, मतदार,शेतकरी बांधवांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली तसेच त्यांना मतदानाचे आवाहन करण्यात आले.