शहादा l प्रतिनिधी
जानेवारी महिन्यात झालेल्या परदेशी विद्यापीठातून पदवी घेऊन भारतात वैद्यकीय सेवा देवू इच्छिणाऱ्यांसाठी असलेल्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स परीक्षेत (एफएमजीई) डॉ.वरद हिरालाल पाटील हा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे.
डॉ.वरद पाटील याने यावर्षीच रशिया येथील नामांकित शासकीय वैद्यकीय विद्यापीठ असलेल्या स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल विद्यापीठात सर्वोत्तम श्रेयांकाने एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी वरद प्रयत्नशील आहे.
डॉ.वरद हा सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले जलसाक्षरता समितीचे प्रा.डॉ.एच.एम. पाटील व जायन्टस फेडरेशनच्या अध्यक्षा ॲड.संगीता पाटील या दाम्पत्याचा ज्येेष्ठ चिरंजीव आहे. फक्त 19 टक्के निकाल लागलेल्या परीक्षेत डॉ.वरदने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.