शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी रावे उपक्रमांतर्गत अलखेड ता.शहादा येथे कृषी मेळावा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलखेडचे ग्रामसेवक निलेश सोनवणे होते.यावेळी तिखोराचे उपसरपंच परशुराम सोनवणे, अलखेडच्या सरपंच लताबाई गायकवाड, खरेदी विक्री संघाचे मॅनेजर अनिल पाटील, प्रविण पाटील, दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ ,शेतकरी यांची उपस्थिती होती.या उपक्रमांतर्गत उपस्थित शेतक-यांना शेतीशी निगडीत विषयांवर कृषी महाविद्यालय शहादा येथील प्राध्यापकांनी अनमोल मार्गदर्शन केले. त्यांना असलेल्या अडचणींवर उपाय सूचवून समस्यांचे समाधान करण्यात आले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल, प्रा. चंद्रशेखर पाटील , प्रा.डाॅ. बी. सी. चौधरी आणि प्रा. के.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या उपक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी कौतुक केले.