नंदुरबार l प्रतिनिधी
येथील बडगुजर समाजातर्फे रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हळदी कुंकू, समाजाची वार्षिक मिटींग तसेच सर्वांसाठी विविध खेळ आयोजित केले आहेत.
येथील बडगुजर समाजातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार तसेच समाजातील पदोन्नती प्राप्त नागरीकांचा गौरव करण्यात येतो.
त्याच अनुषंगाने यंदाही नंदुरबार जिल्हा बडगुजर समाज उन्नती मंडळ व बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील न.पा.शाळा क्र.१ येथे रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी स्नेह मेळावा संपन्न होईल. सायंकाळी ४ वाजता हळदी कुंकू, ४.३० वाजता विविध खेळ तर ५ वाजता वार्षिक मिटींग होईल. शेवटी स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता होईल. यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.