नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील रनाळे येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 59 वी पुण्यतिथी सोहळा उत्सव साजरा करण्यात आला. समस्त वंजारी समाज मंडळ रनाळे , ढंडाणे व शनीमांडळ व श्रीसंत भगवान बाबा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कीर्तन व धार्मिक उत्सवासह विविध उपक्रम राबविण्यात आले.
श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भगवान बाबा यांच्या प्रतिमेची वाजत गाजत पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली तसेच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीं मध्ये पीएसआय म्हणून विनोद गाभणे यांचा तर समाज भूषण मक्कनराव साबळे, डॉ, हेमंत नागरे, देविदास पेटकर यांना शाल श्रीफळ व स्मृति चिन्ह देऊन गौरवण्यात आले .
तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्वराज संदीप सानप, ईश्वरी सुनील नागरे,नैतिक संदीप चकणे,हर्षदा प्रकाश काकडे, त्रिवेणी योगेश आव्हाड ,अक्षरा नरेंद्र नागरे,लावण्या अशोक आव्हाड, कविता विजय आव्हाड,मनश्री नरेंद्र नागरे ,प्रियंका सुनील आव्हाड ,मानवी प्रकाश काकडे,कल्याणी पंकज नागरे , क्षितिजा संजय कळकटे ,खुशी विशाल कळकटे,भावेश गणेश वंजारी , विनायक किशोर वंजारी,मनोज रवींद्र धात्रक , पुनम अशोक सानप,स्वामी राजेंद्र नागरे,तुषार गणेश ओगले, प्रतीक्षा सतीश गाभणे,रोहित रवींद्र घुगे,स्वप्निल विजय आव्हाड , कृष्णा गणेश ओगले ,हर्षल मनोज शिंत्रे, मनीस संजय ओगले,काजल निंबा धात्रक ,साहिल शरद सांगळे ,साई देविदास कळकटे ,पूर्वेश सुनील नागरे ,बाळकृष्ण विशाल कळकटे, महेश बापू नागरे,नचिकेत दिनेश गवते, लक्ष्मी भगवान गवते , खुशी चंद्रकांत चकोर ,रुचिता जितेंद्र नागरे ,सोनल भैया शिंत्रे ,द्वारकेश निंबा घुगे ,रितेश सुनील घुगे,कुणाल धनंजय विंचू ,प्रथमेश योगेंद्र गीते,रितेश राकेश घुगे आदित्य सुरेश भाबड यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व शालेय वस्तू भेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
तसेच कोरोना काळातील काम करणाऱ्या वंजारी समाजातील व्यक्ती बळीराम नागरे, बुधा धात्रक ,गणेश शिंत्रे, योगेश सानप , भरत चकोर, राजेंद्र धात्रक व हिरा धात्रक, आप्पा शिंत्रे, संजय आव्हाड ,अमोल पेटकर , दीपक ओगले ,सुनील नागरे ,शांताराम आव्हाड, गौरव आव्हाड,राजू काकडे, गौरव आव्हाड , कपिल गाभणे यांचा सत्कार वंजारी समाजाचे अध्यक्ष गोकुळ नागरे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार श्री ह भ प विजय काळे महाराज पिंपळनेर यांचे जाहीर कीर्तन, गायनचार्य हभप दिगंबर महाराज, संगीत अलंकार हभप कन्हैया महाराज व मृदुंगचार्य हभप पावभा महाराज व रनाळे, घोटाणे, आसाने व खोकराळे येथील भजनी मंडळाच्या उपस्थित कीर्तनाचे कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नारायणपूर येथील अष्टवक्री महाराज, शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक गवते, जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंत्रे, समाज अध्यक्ष गोकुळ नागरे, रवींद्र भाबड , सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ओगले , वसंत शिंत्रे, माधवराव नागरे, भरत चकोर ,दिलीप घुगे, किरण घुगे ,नाना मानभाव ,राकेश घुगे, सुरेश भाबड, गोपाल शिंत्रे, संजय भाबड, गोकुळ नागरे, राजू नागरे, महेश सांगळे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीसाठी नरेंद्र नागरे, अमोल आव्हाड यांच्यासह वंजारी समाजातील रनाळे, ढंडाणे ,शनिमांडळ येथील तरुणांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. हेमराज भाबड यांनी केले.








