नंदुरबार l प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम राबविण्यात आले.
श्री स्वामी समर्थ केंद्राचा माध्यमातून 20 टक्के अध्यात्म व 80 टक्के समाजकार्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) जिल्हा केंद्र नंदुरबार च्या माध्यमातून राबविले जात असतात. लोकांच्या कल्याणासाठी हा मार्ग कायम धडपडत असतो मनुष्य जातीच्या व्यतिरिक्त सृष्टीतले जे ही काही प्रश्न असतील ते सर्व श्री समर्थ महाराजांच्या मार्गाच्या माध्यमातून सुटत असतात 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आहे स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले याच्याच माध्यमातून श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने दर 26 जानेवारी या दिवशी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जात असते त्याच पद्धतीने प्रजासत्त्ताक दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र नेहरू पुतळ्या जवळ या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. रमा रवींद्र वाडीकर
( जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी रक्त केंद्र नंदुरबार ) यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदानाच्या सेवेत एकून 127 बंधू भगिनींनी सहभाग घेतला. तसेच दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध मंदिरात स्वच्छता करण्यात येत असते. त्याच माध्यमातून श्रमदानातून स्वच्छता अभियान या उपक्रमांतर्गत श्री दंडपाणेश्वर मंदिर या ठिकाणी जाऊन स्वच्छता करण्यात आली.
यावेळी महिला व पुरुष सेवेकाऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील करण्यात आले होते यावेळी लहान सेवेकाऱ्यांनी देशभक्तीवर नृत्य सादर केले.








