नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर परिसरात ७५ प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद केंद्र शाळा, कन्या विद्यालय शिवदर्शन विद्यालय, शासकीय आश्रम शाळा यांनी भालेर, नगाव, तिशी गावातून प्रभात फेरी काढली.
भालेर- वडवद ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयावर कार्यालयावर ध्वजारोहण सरपंच वैशाली दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपसरपंच गजानन पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील ग्राम विस्तार अधिकारी एस .पी .पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषद केंद्र शाळा भालेर, नगाव, तिसी अनिता रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भलेरच्या सरपंच वैशाली पाटील, सरपंच दिलीप पाटील, मुख्याध्यापक पंकज वानखेडे ग्रामस्थ विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.का.वि. प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क पू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजयराव पाटील संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील भालेरच्या माजी सरपंच/संस्थेच्या संचालिका बेबीताई भास्करराव पाटील ,सचिव भिका पाटील, रमेश पाटील, शहाणा धनगर, भालेरचे व्यापारी रमेश मोदानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ व्हि.बी चव्हाण विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. व्हि .कुवर व भालेर, नगाव, तिसी निंभेल काकर्दे सिंदगव्हाण वडवद, ओसरली पंचक्रोशीतून पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. छात्रालयाचे ध्वजारोहण सेवानिवृत्त शिक्षक सी. के. पाटील यांनी केले व विद्यालयाचे ध्वजारोहण शानाभाऊ धनगर यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश मोदानी होते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या व सहभागी विद्यार्थ्यांचे गोल्ड, सिल्वर, कास्य मेडल व प्रमाणपत्र देउन गौरव करण्यात आला. क्रीडा स्पर्धेत विभाग स्तरावर स्थान प्राप्त करणारे सिद्धेश मुकेश पाटील व ओम सुकलाल धनगर, बबीता वळवी यांचा गौरव करण्यात आला. मुंबई पोलीस मध्ये निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,युवक संसद म्हणून सहभाग असलेला माजी विद्यार्थी मुकेश पाटील चा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी विविध बोली भाषेतील नृत्य सादर केली तसेच ओसरली येथील आदिवासी विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी एस सूर्यवंशी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व्ही .व्ही. इशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.शिवदर्शन महाविद्यालयात ध्वजारोहण जिजाबाई प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास बाहेरच्या सरपंच वैशाली पाटील, तिसीचे सरपंच दिलीप पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील,मुख्याध्यापक आर. एच. बागुल भालेर, नगाव, तिसी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कृषि तंत्र विद्यालय उमर्दे रोड, ( होळ शिवार ) ता. जि.नंदुरबार येथे प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे प्राचार्य के.जी. मराठे होते . पंचायत समिती सदस्य दिपक मराठे यांनी ध्वजारोहण केले . प्रमुख पाहुणे शिवसेनेचे युवा नेते कैलास माळी कृषि तंत्र विद्यालय बोराडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य के. जी. मराठे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वैभव बच्छाव, एस. के. बोराणे व एस.आर. सैंदाणे मॅडम यांनी खूप परिश्रम घेतले.








