नंदुरबार l प्रतिनिधी
आपत्तीच्या वेळेस शासनाने शेतकऱ्यांना ३०० रुपये नुकसान भरपाई दिली होती. परंतु, त्यावेळेस परिसरातील शेतकऱ्यांजवळ पावत्या नसल्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र कांदा मार्केट उभारण्याच्या निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना सेवा सुविधा पुरवण्याचे काम बाजार समितीच्या कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळाचे आहे. व्यापाऱ्यांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वतंत्र खुल्या कांदा मार्केटचे उद्घाटन आरटीओ कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत माजी आ. रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दोन ते अडीच महिने आरटीओ कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत लिलाव होईल त्यानंतर पळाशी येथील कापूस विक्री केंद्रात कांदा मार्केट भरवण्यात येईल.मार्केट नवीनच असल्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कांदा मार्केट यशस्वी करण्याची आपली जिद्द आहे. व्यापाऱ्यांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी यांनी केले. यावेळी जि.प सदस्य देवमन पवार यांनी मनोगत व्यक्त केले.प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऍड.राम रघुवंशी,व्हा.चेअरमन वर्षा पाटील,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार,माजी नगरसेवक परवेज खान, पं.स सदस्य कमलेश महाले,विजय माळी,बाजार समिती संचालक किशोर पाटील, दिनेश पाटील, संध्या पाटील, कुशलचंद बिर्ला,ठाणसिंग राजपूत,मधुकर पाटील, सुनील पाटील,अनिल गिरासे, विजय पाटील,दीपक मराठे, गोपीचंद पवार, लकडू चौरे, प्रकाश पाटील,गिरीश जैन,अशोक आरडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव योगेश अमृतकर यांनी केले.
पहिल्या दिवशी २ हजात क्विंटलची आवक
पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १२५ गाड्यांमधून २ हजार क्विंटल कांद्यांची आवक झाली. कमीत कमी ६५० रुपये तर जास्तीत जास्त १४५० रुपयांच्या दर मिळाला.सरासरी ८५० ते ९०० रुपये भाव असून, परवानाधारक ५ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे.








