नंदूरबारl प्रतिनिधी
नंदुरबार पोलीस दलातर्फे 3 ते 11 जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली.यात अवैध जुगाराचे विरुद्ध 104, अवैधरित्या दारुची विक्री व वाहतुक करणा-यांविरुद्ध एकूण 231, अवैध गुटखा, 6 कारवाया,गांजाची 1 कारवाई करण्यात आली.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 3 जानेवारी सायंकाळी 8 ते 11 जानेवारी 2024 च्या सकाळी 6 वा. दरम्यान जिल्ह्यात एक आठवडा विशेष मोहिम राबविण्यात आली होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहिम राबविणेबाबत नियोजन केले. सदर विशेष मोहिमे दरम्यान अवैध / बेकायदेशीर बाबींवर कडक कायदेशीर कारवाई करणे बाबतच्या सुचना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सर्व उप-विभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
त्यानुसार एक आठवडयाचे विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्हयात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाणे यांच्या मार्फतीने करण्यात आलेली कारवाई, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत अवैध जुगाराचे विरुद्ध एकूण 104 कारवाया करण्यात आल्या असुन त्यामध्ये एकूण 3 लक्ष 4 हजार 400 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आहे. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत अवैधरित्या दारुची विक्री व वाहतुक करणा-यांविरुद्ध एकूण 231 कारवाया करण्यात आले असुन त्यामध्ये एकूण 64 लक्ष 20 हजार 708 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित पानमसाला सुगंधित तंबाखू, गुटख्याचे बेकायदेशीर विक्री व साठा करणाऱ्यांविरुद्ध एकूण 6 कारवाया करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 3 लक्ष 89 हजार 950 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत एकूण 2 कारवाई करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 17 गोवंश हे गोशाळेचे ताब्यात देण्यात आले आहे. अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरुध्द NDPS कायदयांतर्गत गांजाची 1 केस करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 3 लक्ष 52 हजार 380 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच यापुढे देखील अवैध धंदयांवर जिल्हयात वेळोवेळी कडक कारवाई करण्याचे संपुर्ण जिल्हा पोलीस दलास पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी सक्त सुचना दिल्या आहेत. अवैध/बेकायदेशीर बाबींविषयी कुठल्याही प्रकारची माहीती सामान्य नागरिकांना अवगत असल्यास ते कळविण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी नंदुरबार जिल्हावासियांना केले आहे.








