नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा येथे आज एक कोरोना रुग्ण आढळला, दरम्यान काल पाच जण कोरोणामुकत झाले होते.त्यामुळे नवापूर तालुका तूर्त कोरोनामुक्त झाला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात आज प्रशासनातर्फे 188 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.त्यात तळोदा येथील पंचायत समिती मधील एकाचा कोरोना अहवाल positive आला. दरम्यान काल नंदुरबार तालुक्यातील 4 व नवापूर तालुक्यातील एक असे पांच रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.त्यामुळे नवापूर तालुका तूर्त कोरोनामुक्त झाला. सध्या नंदुरबार जिल्ह्यात सध्या 7 कोरोना रुग्ण आहेत.त्यात नंदुरबार तालुका 3, शहादा 2, अक्कलकुवा व तळोदा येथे प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आहे.