नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी तेजस पाटील या विद्यार्थ्याने राजमाता जिजाऊ तर क्रिश टोंगळे या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा केलेली होती.
सदर दिनानिनिम शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ईयत्ता 5वी व 6वी साठी हस्ताक्षर स्पर्धा, 7वी व 8वी साठी चित्र रंगभरण स्पर्धा, 9वी व 10 वी साठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या सर्व स्पर्धांमध्ये शाळेतील एकूण 425 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक उपस्थित होते. यावेळी सरांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कश्याप्रकारे राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच स्वामी विवेकानंद यांचे चरित्र आजच्या पिढीला कसे आदर्श आहे हे समजावून सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांमधून मुजतबा पिरजादा, श्रीदत्त पाटील व विराज वायकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच व्यासपीठावर उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण, हेमंत खैरनार उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सू्रसंचालन कमल चौरे यांनी केले, प्रास्ताविक तुषार नांद्रे आभार निलेश गावित यांनी केले.








