शहादा l प्रतिनिधी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमातील बदलाबाबत चर्चा करण्यासाठी स्कूल कनेक्ट अभियान अंतर्गत कबचौउमविच्या वतीने पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय परिसंवाद संपन्न झाला.
भारत सरकारने स्वीकृत केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे पदवी व पदव्युत्तर स्तरावर भारतातील बहुसंख्य विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू करण्यात येणार आहे.यासंदर्भात धोरणात्मक जनजागृती व्हावी या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कुल कनेक्ट अभियाना अंतर्गत पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार दि.9 जानेवारी रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020:विषय आणि संभावना या शीर्षका अंतर्गत एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
या परिसंवादासाठी प्रमुख वक्ते म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील होते.आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणात त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार,पदवी व पदव्युत्तर स्तरावरील होणारे मोठे बदल विशद करीत या शैक्षणिक धोरणामुळे आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या समस्यांचं निर्दालन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.तसेच विद्यापीठाने तयार केलेला त्रिभाषासूत्री लवचिक अभ्यासक्रम व उच्च शिक्षणातील महत्वपूर्ण योजना उपस्थित विद्यार्थी व पालकांसमोर विशद केल्यात.सदर परिसंवादासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.के.के.पटेल ,वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिंदखेडकर ,पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश,प्रा. व्ही.सी.डोळे तसेच कला,विज्ञान वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील इ.12 वीचे सुमारे पाचशे विदयार्थी,पन्नास पालक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
सुत्रसंचलन प्रा.डॉ.चंद्रशेखर सुतार यांनी केले तसेच तांत्रिक सहाय्यांची बाजू प्रा.डॉ.मिलिंद पाटील,प्रा.अरविंद पाटील यांनी पाहिली ,आभार प्रा.वजीह अशहर यांनी मानले.परिसंवाद यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले.








