नंदुरबार l प्रतिनिधी-
विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवल्याने नंदुरबारात आमदार कार्यालय परिसरात जल्लोष करण्यात आला.यावेळी ‘जय भवानी’,’जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की,जय अशा घोषणा देऊन फटाक्यांच्या आतिषबाजी करीत जल्लोष करण्यात आला.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी निकालाचे स्वागत केले आहे. सायंकाळी आमदार कार्यालय परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र जमले होते.निकाल लागताच बरोबर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी,युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रेम सोनार, शहराध्यक्ष रवींद्र पवार,बाजार समिती संचालक किशोर पाटील, विजय माळी, राजेश वसावे, विधानसभा समन्वयक नवीन बिर्ला,चेतन सुळ, दुर्गेश शिरसाठ,रुपेश जगताप,दादाभाई मिस्तरी,पिंटू सुतार,निलेश हिरे आदी उपस्थित होते.








