नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालय व औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या नामकरण सोहळा व रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्या.भूषण गवई यांच्या हस्ते शनिवारी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे हरिपूर (केवडीपाडा) येथे त्यांच्या हस्ते विधी साक्षरता अभियानाचे उद्घाटन होईल अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
आमदार कार्यालयात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी जि.प सदस्य ॲड.राम रघुवंशी,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती कैलास पाटील उपस्थित होते. माजी आ.रघुवंशी म्हणाले, नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयाचे बटेसिंगभैय्या रघुवंशी तर औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाला श्रीमती विमलताई बटेसिंगभैय्या रघुवंशी असे नामकरण करण्यात आलेले आहे. सकाळी १० वाजता हरिपूर (केवडीपाडा) ता.नंदुरबार येथे विधी साक्षरता अभियानाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्या.भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नितीन सांबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा प्रमुख व सत्र न्या. उदय शुक्ल, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.परिजात पांडे, नवी दिल्ली येथील बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. जयंत जायभावे, भारत सरकारचे माजी अप्पर महाभियोक्ता ॲड.राजेंद्र रघुवंशी, पं.स सदस्य दीपमाला भील, जि.प देवमन पवार,पं.स सदस्य कमलेश महाले,संतोष साबळे, सरपंच सुरेश भोये,उपस्थित राहणार आहेत.
विधी व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा नामकरण सोहळा व रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ शनिवार (दि.१३) रोजी दु.२ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्या.भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नितीन सांबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा प्रमुख व सत्र न्या. उदय शुक्ल, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.परिजात पांडे, नवी दिल्ली येथील बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. जयंत जायभावे, भारत सरकारचे माजी अप्पर महाभियोक्ता ॲड.राजेंद्र रघुवंशी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी,सचिव यशवंत पाटील, प्राचार्य डॉ.एन.डी चौधरी यांनी केले आहे.








