नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन ह. भ. प. श्री महंत पंडित गुरुजी यांच्या नेतृत्वाने हजारो साधू संतांचा उपस्थितीत ११ जानेवारी २०२४ वार गुरुवार रोजी अन्नपूर्णा प्रांगणात प्रकाशा येथे आयोजित करण्यात आले आहे.
10 जानेवारी बुधवार रोजी तेरा कोटी राम नाम जपाची पूर्णाहुती करून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे, या कार्यक्रमात, नाशिक, सटाणा, शिरपूर, धुळे, जिल्ह्यातून मोठ्या संख्येने धर्म प्रेमी उपस्थित होणार आहेत. धर्म संस्कृती संस्कार या वर साधू संत महात्मे सर्व भाविक भक्तांना या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. या धर्म कार्यात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे ट्रस्टी हेमंत पाठक, महेंद्र पाटील, गिरिधर पाटील, राजाराम पाटील, हिरालाल पाटील यांनी केले आहे.








