म्हसावद । प्रतिनिधी
तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे भारत जोड़ो आभियानच्या वतीने बिरसा मुंडांच्या उलगुलान विद्रोह दिन व फातिमा शेख यांच्या जयंती निमित्ताने नंदुरबार लोकसभा मतदार संघातिल कार्यकर्ते व नागरिकांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल देवून जन गण मन अभियानात सहभागी होण्याची मोहिम सुरु केली गेली.
या मेळाव्याला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री पद्माकर वळवी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांच्या सह जिल्ह्यातील विविध पक्ष कार्यकर्ते ही उपस्थित होते.
या मेळाव्याचे आयोजन भारत जोड़ो अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. किशोर सामुद्रे (भारत जोडो अभियान जिल्हा समन्वयक) दादाभाई पिंपळे (भारत जोडो अभियान राज्य समिती सदस्य’) रंजना कान्ह्रेरे (भारत जोडो अभियान राज्य समिती सदस्य’) भीमसिंग वळवी, चुनीलाल ब्राम्हणे , संजय महाजन, तारा मराठे, अकबर भाई शेख, काथा वसावे,, लक्ष्मी वळवी, अरुण जगदेव, गणेश वळवी. पितांबर बिऱ्हाडे, शिरीष गावित,रघुनाथ बळसाणे, निशा तांबे. यांनी केले होते.
या मेळाव्यात बोलताना उदेसिंग पाडवी यांनी २०२४ ची निवडणूक ही जर भाजपा ला रोखले नाही तर शेवटची निवडणूक ठरू शकते कारण ही निवडणूक संविधान व लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून काम करू असे आश्वासन दिले
आमश्या पाडवी यांनी आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी यांनी आम्हाला आदेशच दिला आहे की, नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा रहाणार आपण त्यांना निवडून आणायचे आहे आणि त्यानुसार आम्ही सर्व प्रयत्नांनीशी प्रचार करू मात्र काँग्रेस ने आपला उमेदवार तातडीने जाहीर करावा असे आवाहन केले.
माजीमंत्री पद्माकर वळवी यांनी भारत जोडो अभियान हे आज महत्वाचे आहे कारण सर्वांनी एकत्र येऊन भाजपाचा पराभव करणे गरजेचे आहे.या देशात मोदी हे लोकांची दिशाभूल करून द्वेषाचे राजकारण करीत आहेत आपण तालुका तालुक्यात जाऊन मतदारांमध्ये जागृतीचे काम करू या काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू या असे आवाहन केले.
या मेळ्याव्यात भारत जोडो अभियान व जन गण मन या मिस कॉल मोहिमेची भूमिका संजय महाजन यांनी मांडली तर प्रास्ताविक हे दादाभाई पिंपळे यांनी केले भारत जोडो अभियानाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाची माहिती सांगून भारत जोडो अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.अभियान बाबत विस्तृत माहिती डॉ किशोर समुद्रे यांनी मांडली.मेळाव्याचे सूत्र संचालन हे चुनीलाल ब्राम्हणे यांनी तर आभार प्रदर्शन भीमसिंग वळवी यांनी केले. कार्यक्रमात जिल्ह्याभरातून लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








