नंदुरबार l प्रतिनिधी
येथील माजी उपनगराध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे खंदे समर्थक रवींद्र अशोक पवार यांची नंदुरबार शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व धुळे-नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मान्यतेने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या सहमतीने रवींद्र पवार यांची शिवसेनेच्या नंदुरबार शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
रवींद्र पवार यांनी माजी नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष पद भुषविले आहे. ते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे खंदे समर्थक असून सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करतील तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेवून काम करतील, असा विश्वास रवींद्र पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.








