नंदुरबार l प्रतिनिधी
का. वि. प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे सावित्रीबाई फुले जयंती,बालिका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.विद्या चव्हाण होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहारअर्पण केला. यावेळी पर्यवेक्षक अनिल कुवर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन. विजयसिंह ईशी यांनी केले. तसेच विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात विद्यार्थीनीनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी ओव्या, गीते सादर केली. व मनोगत व्यक्त केली. एम.आर.पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले व आई सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त केले. सौ.एस. पी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.