नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाबाबत एस.ए.मिशन हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांचे शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा” हे अभियान शासनाद्वारे राबवण्याचे प्रस्तावित आहे यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग या अंतर्गत शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता,

राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तसेच शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यामध्ये आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा तसेच अध्यापन, तंबाखू मुक्त शाळा, अशा विविध उपक्रमांचे शासनाद्वारे आयोजन करण्याचे योजिले आले असून सदर अभियानात सहभागी शाळांचे यामध्ये तालुका, जिल्हा, विभाग, तसेच राज्यस्तरावर मूल्यांकन करण्यात येणार असून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांना पारितोषिक देण्यात येणार आहे.
या वेळी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना देण्यात येणारा संदेशाबाबतची सविस्तर माहिती त्यामागील शासनाचा उद्देश व हेतू याबत सविस्तर माहिती शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी विद्यार्थ्यांना दिली व हा संदेश विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी सामूहिक रित्या वाचन केले. ह्या वेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








