म्हसावद । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष पदी शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील युवा कार्यकर्ते निखिल माळी यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांनी विविध संघटनांची जिल्हा कार्यकारणी घोषित केली आहे. त्यात भाजपा युवा मोर्चा ची कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष पदी निखिल माळी यांची युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी यांची नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने तसेच प्रदेश महामंत्री विजय चौधरी तथा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्राहुल लोणीकर यांच्या सूचनेनुसार तसेच नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांच्या मंजुरीने आणि युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. निखिल माळी यांच्या मागील कार्याची दखल घेत पार्टी ने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली असून सर्वत्र माळी यांचे कौतुक होत आहे.








