नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील निलेश भरत चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या सूचनेने व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या मान्यतेने तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या शिफारशीने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निलेश भरत चौधरी (नंदुरबार) यांची नियुक्ती करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
निलेश भरत चौधरी यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.








