नंदुरबार l प्रतिनिधी
जागतिक धूम्रपान विरोधी दिनानिमित्त कोकणीपाडा येथील श्री डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालयात धूम्रपान विरोधी कार्यक्रम घेण्यात आला. त्यानिमित्त धूम्रपानामुळे मानवाच्या जीवनावर व शरीरावर होणारे परिणाम याबाबत चित्रांचे प्रदर्शन घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सारंग परदेशी यांनी घरात व समाजात धूम्रपान व्यसन करणारे व्यक्ती दिसून आल्यास त्यांचे योग्य प्रबोधन करा. त्यांना या व्यसनापासून कसे परावृत्त करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. पी. एम. साळुंखे व जे.एच. गिरासे यांनी धूम्रपानामुळे समाजाचे व देशाचे कसे नुकसान होऊ शकते.
युवा पिढी लवकर व्यसनाच्या आहारी जाते याची कारणे व दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व्यसन विरोधी कविता व घोषवाक्य सादर केले. तसेच व्यसन व धूम्रपान यांच्या प्रतीकात्मक होळीचे दहन करण्यात येऊन व्यसनापासून दूर राहण्याची व समाजाला व्यसनमुक्त करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
प्रास्ताविक वाय. व्ही. कोकणी यांनी केले. सूत्रसंचालन एम.डी. चौरे यांनी तर आभार श्रीमती शितल वळवी यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर. एस. गांगुर्डे, के.व्ही.तायडे, एन. ए. कदमबांडे, दशरथ घुगे, राजू वळवी आदींनी सहकार्य केले.








