शहादा l प्रतिनिधी
अखिल भारतीय भोई समाज संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य अधिवेशन दि. 27 व 28 डिसेंबर रोजी तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे संपन्न झाले.या अधिवेशनात शहादा येथील माजी नगरसेवक सुपडूभाऊ खेडकर यांना समाजरत्न तर जयंतीलाल खेडकर (शहादा), रामदास दामू मोरे (तोरखेडा), भाईदास भोई (शिरपूर) यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध देवस्थान तिरूपती येथे भोई समाज बांधवांचे दोन दिवशीय संमेलन पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली.प्रस्ताविक गजानन साटोटे (राष्ट्रीय सरचिटणीस अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्था) यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये असे अधिवेशने घेतले जातील.संस्थेने आजपर्यंत केलेले कार्य त्यांनी सांगितले. काही मुलं संस्थेने दत्तक घेतले. बऱ्याच ठिकाणी वह्या वाटप केल्या. भुवनेश्वर येथे मुलांना कपडे वाटप केले. अपंग व्यक्तींना मदत केली. बाबुराव तमखाने (गंगाखेड) यांच्या मुलीला नावाडी कामापासून मुक्त करून सक्षम बनवले.तसेच सर्वजण विश्वासाने या अधिवेशनाला आले म्हणून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.दि.26 फेब्रुवारी 2024 ला नागपूर येथे बैठक घेऊ.तसेच शिवाजी पार्क गाजवू असेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय समाज संस्थेचे अध्यक्ष एकनाथ काटकर यांनी आपला समाज एसटीमध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठी लढा दिला पाहिजे. भोई समाजा साठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासाठी लढा दिला पाहिजे. महाराष्ट्र शासनामार्फत भोई समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासाठी मागणी करू.समाजाची स्मरणिका काढू त्यात सर्व समाजाकडुन लेख,कवीता,साहित्य मागवले जाईल.सामाजिक काही समस्या असतील त्यांनी लेखी स्वरुपात अर्ज द्यावा त्याचा विचार करण्यात येईल असे प्रतिपादन केले.
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य तसेच सेवानिवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालय चंद्रलाल मोश्राम यांनी विचारलेल्या समस्यांचे समाधान केले व क्रिमिलेयर विषयी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थाचे कार्याध्यक्ष सुपडू खेडकर यांनी तिरुपती देवस्थानाविषयी आदर व्यक्त करत भगवान विष्णूचे नगरीत कार्यक्रम ठेवला त्यासाठी सर्वांचे चांगलेच होईल असा विश्वास व्यक्त केला.तुम्ही सांगा तेव्हा आम्ही मोठ्या संख्येने हजर राहू असे गजानन साटोटे यांना त्यांनी सूचित केले. तुकाराम वानखेडे (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) व सी.एम.भोई (शिरपूर) यांनी हा कार्यक्रम घेण्याविषयी सूचना मांडली असे त्यांनी सांगितले. आपल्या समाजात एकी पाहिजे. पुढे जाणाऱ्यांचे पाय मागे खेचू नये.आमदार-खासदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यात सुपडूभाऊ खेडकर यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जयंतीलाल खेडकर (शहादा), रामदास दामू मोरे (तोरखेडा),शिरपूर येथील भाईदास भोई (अध्यक्ष धुळे समाजसेवा संस्था) यांचाही समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात.यावेळी इतर मान्यवरांचाही विविध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटक सखाराम पानझडे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश लोणारे ,दिल्लीचे अध्यक्ष सुरेश गोंड,मुरहरी केळे (मुख्य अभियंता महावितरण महाराष्ट्र राज्य), तुकाराम वानखेडे (अध्यक्ष महाराष्ट्र भोईसमाज),रामकृष्ण मोरे ,प्रकाश वानखेडे, (नंदुरबार) सी.एम.भोई, भाईदास भोई , भरत भोई, गोकुळ भोई सुरेश भोई शिरपूर ईश्वर मोरे, राजू तावडे (सारंगखेडा),मुकुंद भोई (पारोळा),मनोहर भोई ,प्रकाश रामोळे (साक्री) आदि उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतने करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भानारकर यांनी केले.आभार भाईदास भोई व रामकृष्ण मोरे यांनी मानले.








