नंदुरबार l प्रतिनिधी
खाकी वर्दी ही देशाची शान आहे तिचा मान व सन्मान राखण्या साठी होमगार्ड पथकाचे काम देखील मोलाचे आहे असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक अधिकारी निलेश तांबे यांनी केले.नंदूरबार येथे होमगार्ड पथकामार्फत पदोन्नती व गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमांची सुरवात दिपप्रज्वलंनाणे करण्यात आली ह्या वेळेस माजी समादेशक अधिकारी मनोज दीनानाथ श्रॉफ,महिला सक्षमिरनच्या कार्यकर्त्यां सुलभा महिरे तसेच श्रीराम दाऊदखाणे, नरेंद्र सराफ,प्रवीण पाटील, शिंकारा आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या वेळेस उपस्थित मान्यवरांनी होमगार्ड पथका विषयी सकारात्मक आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळेस मान्यवरांचा पदोन्नती गुणगौरव करण्यात आला यात रावसाहेब भिका पाटील,पावबा छगन मराठे,किशोर लाला गोसावी,मनोज शिवदास मराठे, मनोहर गिरधर चौधरी वरिष्ठ पलटण नायक,सुरज रायसिंग ठाकरे,दिनेश धर्मा महाजन,गुलाब बाबुराव माळी पलटण नायक,उमाकांत प्रल्हाद वसईकर मुकेश रमेश राजभोज,कैलास सुरसिंग मोरे, अमृत दगडू खेडकर यांचा गौरवण्यात आले..सूत्रसंचलन किरण दाभाडे यांनी केले.आभार रावसाहेब पाटील यांनी मानले.
सदर कार्यक्रमच्या नियोजनात आशिष कापडणीस,दीपक सैदाने, संजय मराठे यांनी परिश्रम घेतले








