नंदुरबार l प्रतिनिधी
भालेर ता.नंदूरबार येथील शिवदर्शन विद्यालयात नवीन १२ खोल्याचे फित कापून उदघाटन मा. आमदार चंद्रकांत रघुवंशी व सरपंच वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नंदुरबार तालुका विधायक समितीचे सरचिटणीस यशवंत पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी नंदुरबार नगर परिषद पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश पाटील भालेरचे उपसरपंच गजानन पाटील, नगाव ,तिसीचे सरपंच, भालेर विकास सोसायटीचे चेअरमन हिम्मतराव पाटील,अशोक पाटील युवराज पाटील प्राचार्य आर.एच. बागुल आदी उपस्थित होते .
नंदुरबार तालुका विधायक समितीची भालेर येथे १९६५ साली शिवदर्शन विद्यालय सुरू करण्यात आले. या शैक्षणिक संकुलात आता एकूण एकोणावीस खोल्या असून खेळाचे मोठे मैदान आहे, विद्यालयात ग्रंथालय, सायन्स लॅब , टीचर रूम, ऑफिस, कॉम्प्युटर लॅब ,आहेत. मार्फत करण्यात येणार आहे. यावेळी भालेर, नगाव,तिसी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.








