नंदुरबार l प्रतिनिधी
पिक विमापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा योजनेचा लाभ मिळावा अशा मागणीचे निवेदन युवक काँग्रेसतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांनी सन २०२३ या आर्थिक वर्षात एक रुपयाचा खरीप पिक विमा काढला असून सदर पिक विमा अर्जाची कंपनीकडून पडताळणी प्रलंबित ठेवण्यात आली आहे . यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क करुन सदर प्रकार कंपनीच्या व शासनाच्या निदर्शनास आणुन देखील कंपनीच्या जिल्हा समन्वयकांकडून दिशाभुल करणारे उत्तरे मिळतात व समाधानकारक पर्याय शोधला जात नाही .
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर कंपनीस पत्र देवून देखील सदर कंपनीने या पत्राची कुठलीही दखल घेतलेली नाही . सदर कंपनीकडून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस दिशाभुल करण्याचे काम सुरु आहे व पडताळणी प्रलंबितचे स्टेटस निघेल व तुम्हालाही पैसे येतील अश्या प्रकारची तोंडी दिशाभुल करणारी उत्तरे सदर कंपनीकडून देण्यात येत आहेत.
याबाबत नंदुरबार तालुक्यातील ढंडाणे , वावद , शनिमांडळ , रनाळे , वैंदाणे , सैताणे , आष्टे , वासदरे , भोणे , चाकळे , इंद्रीहट्टी , तलवाडे खु . रजाळे , बलवंड , खर्दे खुर्दे , तिलाली , कोळदा , शिंदा , पातोंडा , समशेरपुर , लहान शहादा , कोपर्ली , निंभेल , सातुर्खे , होळ , आराळे , भालेर , कार्ली , न्याहली , घोटाणे , उमर्दे , धिकारी कार्यालय , नंदुर तसी – भालेर , मांजरे , ओसर्ली , सेजवा , करजकुपा , खामगांव , पाचोराबारी , ठाणेपाडा , वाघाळे , नागसर , नांदरखेडा , का निश ‘ पापनेर , बिलाडी , टोकरतलाव , खोंडामळी , दहिंदुले , कलमाडी , जुनमोहिदा , सिंदगव्हाण , कानळदा , व्याहुर , वेळावद , धुळवद , गुजरभवाली , गुजरजांभोली , धानोरा , लोय , पिंपळोद , पावला , जळखे रनाळे , अक्राळे , चौपाळे , होळ तर्फे हवेली , आदींसह पंचक्रोशतील शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळालेला नाही.
तरी जिल्ह्यातील पिक विमापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा योजनेचा लाभ तात्काळ मिळवुन द्यावा अन्यथा नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आमरण उपोषण करण्यात येईल. असा ईशारा युवक काँग्रेस कमिटी तर्फे देण्यात आला आहे. यावेळी सदर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले आहे यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंडीत तडवी , खंडेराव पवार,दत्तु पवार , बोखा वसावे,मधुकर वसावे,लिंबा ठाकरे आदी उपस्थित होते.








