नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार राजेश पाडवी यांची सह्याद्री अतिथीगृह वर शहादा तळोदा मतदार संघातील रखडलेल्या जलसिंचन प्रकल्पासंदर्भात यशस्वी बैठक पार पडली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांची जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मतदार संघातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या जलसिंचनाच्या ल.पा.योजना व प्रकल्पा संदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण व रामापुर तसेच अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील प्रकल्प
प्रकल्प अधिक्य व दायित्व देत मंजुरी देण्यात आली. पुढे काम तात्काळ सुरू करण्यात येतील यासाठी आदेश देण्यात आले.
यावेळी बैठकीत शहादा तालुक्यातील रहाटेवाढ धरणासंदर्भातील सुप्रमासाठी आमदार राजेश पाडवी यांनी जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
येणाऱ्या काळात मतदार संघातील जलसिंचनाच्या प्रमुख प्रकल्प व योजनांसाठी सातत्याने कटिबद्ध असून शासन दरबार वेळोवेळी पाठपुरावा करत परिसर सुजलाम सुफलाम व रखडलेल्या योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मी कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला.
आ.राजेश पाडवी








