नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड ता.नंदुरबार येथे एक दिवसीय भारत स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य तथा जिल्हा स्काऊट जिल्हा आयुक्त पुष्पेन्द्र रघुवंशी होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारचे संचालक सुनील पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, हसरत पाटील, उखा पाटील, सरदार सिंग गिरासे, मंगलाबाई पाटील, सविताबाई पाटील आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
श्री रघुवंशी यांनी स्काऊट गाईड याचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले.. शिबिरात स्काऊट गाईड ध्वजाला वंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्काऊट/ गाईड प्रार्थना म्हटली. विद्यार्थ्यांनी आपले तंबू स्वतः उभारून सजावट केली,
सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः स्वयंपाक करून पाक कलेचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष व मान्यवरांनी स्काऊट गाईड कॅप्टन यांनी तंबू परीक्षण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. जी. पाटील यांनी केले.
मुख्याध्यापक ए.बी.पाटील, गाईड कॅप्टन श्रीमती सी. एच. वाघ, एच. एस. साळुंखे, एम.बी. शिंदे, एम बी बोरसे, श्रीमती व्ही.के. गिरासे, डी. ए. चौधरी, बी.एम. चौधरी, सी.एस. पाटील, ए. टी.भिल, भास्कर कुवर, टी.जी. पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.








