नंदुरबार l प्रतिनिध
पंचायत समितीच्या उपसभापतीपदी तेजस पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. यावर्षी उपसभापती पदासाठी ८ महिन्यांच्या फॉर्म्युला असतांना शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सामाजिक समतोल साधत ४ महिन्याच्या कालावधीसाठी पवार यांना संधी दिली आहे.
उपसभापती प्रल्हाद राठोड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नूतन उपसभापती निवडीसाठी पंचायत समितीच्या स्व.हेमलताताई वळवी सभागृहात शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेचे पीठासिन अधिकारी तथा तहसिलदार नितीन गर्जे होते.त्यांना गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी सहाय्य केले.सकाळी ११.३० वाजता सदस्य तेजस पवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून सदस्य संतोष साबळे,कमलेश महाले यांचे नाव होते.
विशेष सभेला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.सदस्य तेजस पवार यांच्या उपसभापतीपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने उपसभापती पदी तेजस पवार यांची नियुक्ती झाल्याचे पिठाचे अधिकारी जयवंत उगले यांनी जाहीर केले.निवड झाल्याने समर्थकांनी पं.स आवारात जल्लोष केला.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी नूतन उपसभापती तेजस पवार यांच्या सत्कार केला.यावेळी पं.स सभापती दीपमाला भील,शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंग वळवी, गोपीचंद पवार,शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे,जि.प सदस्य देवमन पवार, पं.स माजी सभापती माया माळसे, माजी जि.प सदस्य अंबू पाडवी, पं.स सदस्य अंजना वसावे,कमलेश महाले,बेगाबाई भिल,संतोष साबळे, बायजाबाई भिल,कलाबाई भिल,शितल परदेशी,छाया पवार,सरपंच अविनाश भील,जयसिंग पवार आदी उपस्थित होते.








