नंदुरबार l प्रतिनिधी
नाताळनिमित्त येथील मिशन हायस्कूल परिसरातील फ्रँकलिन मेमोरियल चर्च मध्ये आज सकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामूहिक प्रार्थनेसह विविध मान्यवरांनी लावली हजेरी यात खा. डॉ. हिना गावित माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांची विशेष उपस्थिती होती.

नंदुरबार शहरातील मिशन हायस्कूल परिसरात असलेले फ्रँकलिन मेमोरियल चर्चमध्ये नाताळनिमित्त सुवार्ता अलायन्स चर्च मार्फत आज सकाळ पासून विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यात सामूहिक प्रार्थना, येशु जन्माच्या सोहळा, येशु जन्मदिनाचे महत्त्व तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. राजेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली नाताळाचे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी स्थानिक मंडळीचे प्रमुख अनुप वळवी यांनी प्रवचन दिले.
यावेळेस संस्थेचे देवपूर धुळे, शहादा ,धडगाव ,मुंदलवड ,धानोरा, शिरपूर, तळोदा, वाघशेपा या ठिकाणी असलेल्या चर्चमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी खा डॉ हिना गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भेट देऊन ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात जे एच पठारे , ग्लॅडविन जयकर, सॅमसंग जयकर, नेल्सन मार्गे या धर्मगुरूंनी विविध कार्यक्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेश वळवी,संस्थेच्या संचालिका नूतनवर्षा वळवी, कार्यकारणी सदस्य प्रेमानंद लावणे, मार्थाबाई सुतार, सुरेश जांभीरसा, सबस्टीन जयकर, सत्यजित नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला माजी नगरसेवक कुणाल वसावे, विलास रघुवंशी, कैलास पाटील, जगन माळी, किरण चौधरी, निंबा माळी, मोहित राजपूत, मुकेश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.








