नंदुरबार l प्रतिनिधी
व्हॉइस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी केलेली संघटनात्मक बांधणी, बारामती अधिवेशन व नागपूरात हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलनातील सहभागातून संघटनात्मक कार्यकौशल्य दाखविले. या कार्याची दखल घेऊन व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा संपादक ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशभरातील 36 राज्यांमध्ये पत्रकारिता व पत्रकारांसाठी सकारात्मक दृष्टीने काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य जोमाने सुरू आहे. व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी हे कर्तव्य म्हणून जोमाने काम करीत आहेत. आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात देखील काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेंद्र काशिनाथ दोरकर यांची नियुक्ती करून त्यांच्यावर संघटन बांधण्याची जबाबदारी सोपविली होती. ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारितेतील असलेली त्यांची पकड व अनुभव या सर्व बाबींतून नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी आपल्यातील संघटनात्मक कार्याचे कौशल्य दाखविले.
बारामती येथे झालेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिखर अधिवेशनातील सहभाग व नागपूर येथे पत्रकारांच्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनानिमित्त होणाऱ्या आंदोलनातील सहभाग व त्यावेळी केलेले मार्गदर्शन या सर्व बाबींचा विचार करून संघटनात्मक कार्याचे कौशल्य पाहून व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व राज्याध्यक्ष अनिल म्हस्के यांनी नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांच्यावर राज्य कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.
व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य कार्याध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र योगेंद्र दोरकर यांना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व राज्य अध्यक्ष अनिल मस्के यांच्याकडून दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी नुकतेच प्राप्त झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे संघटनात्मक बांधणी करताना त्यांच्यातील कार्यकौशल्य पाहून नंदुरबार जिल्हाध्यक्ष असलेले योगेंद्र दोरकर यांच्यावर आता राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.








