नंदुरबार l प्रतिनिधी
येथील राऊ दिलीपराव मोरे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्षसंघटना मजबूतीने उभी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राऊ मोरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे व युवा नेते डॉ.विक्रांत मोरे यांचे लहान बंधू आहेत.
राऊ मोरे यांनी राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून अनेक आंदोलने, कार्यक्रम घेतले आहेत. या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल राऊ मोरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








