नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल शहराध्यक्षपदी येथील व्यापारी महेंद्रभाई मंगाभाई चौधरी यांची नियुक्ती करण्यातत आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा तथा राज्याची उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने महेंद्र मंगा चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या नंदुरबार शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी महेंद्र चौधरी यांना नियुक्तीपत्र दिले.या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, पक्ष वाढीसाठी, पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत रहावे असे नमूद केले आहे.महेंद्र चौधरी यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.